ग्रामपंचायत हणमंतवडिये

"निर्मल ग्राम"

तालुका-कडेगाव , जिल्हा-सांगली.

(स्थापना १९५९)

ग्रामपंचायत सदस्य

श्री. संपत नारायण मोरे

ग्रामपंचायत सदस्य

श्री.सतीश विलास मोरे

ग्रामपंचायत सदस्य

श्री.सुखदेव किसन मस्के

ग्रामपंचायत सदस्य

सौ. कविता सतिश येवले

ग्रामपंचायत सदस्य

सौ. धनश्री काशिनाथ मस्के

ग्रामपंचायत सदस्य

सौ. नम्रता रुपेश जाधव

ग्रामपंचायत सदस्य

सौ. राजश्री पोपट सकटे

ग्रामपंचायत सदस्य

सौ.सुरेखा धनंजय कुंभार

ग्रामपंचायत सदस्य

दृष्टीक्षेपात लोकसंख्या

0 +

एकूण लोकसंख्या

0 +

शिक्षित लोकसंख्या

0 +

अशिक्षित लोकसंख्या

0 +

कामगार लोकसंख्या

गावाबद्दल

गावाबद्दल माहिती व इतिहास! 

           

सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील क्रांतीकारकांचा ऐतिहासिक वारसा लाभलेले सर्वांग सुंदर गाव म्हणजे ‘हणमंतवडीये’.

हे गाव १२ व्या शतकात वसलेले आहे.   हे गाव येरळा नदीच्या काठावरती वसलेले आहे. पूर्वीच्या काळी येरळा नदीला आलेल्या महापुरातून एक प्राचीन हनुमानाची मुर्ती वाहून आलेली होती. ती मुर्ती आसपासच्या गावातील लोकांनी नेण्याचा प्रयत्न केला परंतु ती मूर्ती कोणालाही उचलता आली नाही. फक्त या गावातील लोकांना ती मूर्ती उचलता आली म्हणून या गावाचे नाव ‘हणमंतवडिये’ असे नामकरण झाले. गावाच्या पूर्वेस येरळा नदी व आंबेगाव असून पश्चिमेस येवलेवाडी गाव आहे. उत्तरेस तुपेवाडी तर दक्षिणेस वडियेरायबाग हे गाव आहे. परिसरातील लोक या गावास ‘छोटे वडवे‘ असे म्हणतात.

सामाजिक व धार्मिक सलोखा :   सर्व जाती धर्मातील लोकं मोठ्या उत्साहात प्रतिवर्षी ज्योतिबाहनुमान जयंतीचा उत्सव चैत्र महिन्यात मोठ्या आनंदी वातावरणात साजरा करतात. गावात विविध देवतांची मंदिरे आहेत. मरिमि देवीचे हे सगळ्यात जूने मंदिर आहे. गावाच्या ईशान्येला एक मोठे महादेवाचे मंदिर असून तेथे श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी मोठा उत्सव असतो. तेथे श्री. ह. भ. प. मारुती बुवा मोरे यांची समाधी बांधली आहे. गावातही महादेवाचे मंदिर असून त्याचे बांधकाम हेमाडपंथिय आहे. गावामध्ये भक्तिसंप्रदाय आहे. नवरात्र निमित्त आश्विन प्रतिपदेपासून विजयादशमी पर्यंत पारायण सोहळा असतो. त्यामध्ये हरिपाठ, आरती, प्रवचन, किर्तन, तसेच सांगता दिंडी इ. मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते आणि पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी दिंडीसाठी भोजन व मुक्काम व्यवस्था गावकडून केली जाते. तसेच बाळूमामा मंदिर, भवानी मंदिर, लक्ष्मी मंदिर, मठ मंदिर, मयाबा मंदिर, बिरोबा मंदिर, पीर मंदिर ही देवस्थाने आहेत.

उत्कृष्ठ सेवा

गावातील उत्कृष्ठ सेवा व योजना

चलचित्र

तक्रार निवारण विभाग

तक्रार निवारण विभाग

अभिप्राय विभाग

अभिप्राय विभाग
Scroll to Top